Advertisement

मंत्रालयात मराठी ग्रंथसंपेदेचं प्रदर्शन


मंत्रालयात मराठी ग्रंथसंपेदेचं प्रदर्शन
SHARES

मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा विभागामार्फत 1 ते 15 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयात मराठी ग्रंथसंपदेचं प्रदर्शन भरवण्यात अालं अाहे. १० ते १२ जानेवारीदरम्यान मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ही ग्रंथसंपदा वाचकांना पाहता येणार अाहे. या ग्रंथप्रदर्शनाला मराठी साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने भेट देत अाहेत.


४२ प्रकाशकांची पुस्तके अाणि सवलती

या ग्रंथ प्रदर्शनामध्ये तब्ब्ल ४२ प्रकाशकांनी आपली पुस्तके विक्रीसाठी ठेवली आहेत. साहित्य, कविता, निसर्ग, कॅलिओग्राफी यांसारख्या सर्व विषयांवरील पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या प्रदर्शनात प्रकाशकांकडून पुस्तकांमध्ये भरघोस सूट दिली जात असल्याची माहिती मराठी भाषा विभागाच्या कक्ष अधिकारी राजश्री बापट यांनी दिली.


'चालता बोलता' प्रश्नमंजुषा

मराठी भाषेची गोडी वाढावी, यासाठी ‘चालता बोलता' हा मराठी भाषेसंदर्भातील प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सध्या बोलीभाषेतही इंग्रजी वापरणाऱ्या लोकांना मराठी भाषा आणि साहित्यातील प्रश्न विचारले जात आहेत. यामध्ये अनेक जण बरोबर उत्तरे देऊन बक्षिसांची लयलूट करत आहेत.


मराठी विकीपीडिया प्रशिक्षण

शुक्रवारी संकल्प कलामंचतर्फे ‘शब्दांचे धन’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये अभिवाचन, नाट्यछटा, काव्यवाचन, संगीत आणि नृत्य आदींचा समावेश आहे. 12 जानेवारी रोजी विधानभवनातील पहिल्या मजल्यावरील वार्ताहर दालनात मराठी विकिपीडिया प्रशिक्षण कार्यक्रम असणार आहे.


सेल्फी पॉईंट

'माझ्या मराठीची किती बोलू कौतुके' असे लिहिलेला सेल्फी पॉईंट येथील खास आकर्षण ठरत आहे. अनेक जणांना या सेल्फी पॉईंटसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाहीये. विशेष म्हणजे या सेल्फी पॉईंटची कल्पना आणि रचना जेजे स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांनी केली अाहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा