Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

१४० क्रमांकावरून फोन आल्यास काय कराल?

ही एका वाहिनीवरील मालिकेची जाहीरात असून या अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून तातडीने करण्यात आलं.

१४० क्रमांकावरून फोन आल्यास काय कराल?
SHARES

कुणालाही १४० क्रमांकाने सुरू होणाऱ्या फोन नंबरवरून फोन आल्यावर तो घेऊ नका, नाहीतर, तुमची आर्थिक फसवणूक होईल, अशी उद्घोषणा करत वस्त्या-वस्त्यांमधून पोलीस फिरत असल्याचा एक व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर एकच घबराट पसरली. त्यानंतर ही एका वाहिनीवरील मालिकेची जाहीरात असून या अफवेवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून तातडीने करण्यात आलं. 

एका टीव्ही चॅनलने आपल्या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेलं हे चित्रीकरण असून त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं. त्यानंतर राज्याच्या सायबर विभागाने तातडीने या चॅनलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार ताबडतोब थांबवण्याची सूचना दिली. परंतु तोपर्यंत नागरिकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. त्यामुळे नागरिकांकडून या वाहिनीवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. या प्रकाराबाबत सायबर विभाग आपला अहवाल मुंबई पोलिसांना देणार आहे.

हेही वाचा- गँगस्टर विकास दुबेच्या २ साथीदारांना ठाण्यातून अटक

दरम्यान, '१४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील सर्व पैसे  काढले जाऊन अकाउंट शून्य होतं' या समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही, मात्र कोणताही कॉल आल्यास आपली वैयक्तिक माहिती देऊ नये.

जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी, क्रेडिट/डेबिट कार्डचे नंबर तसंच  CVV/PIN शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कोणतंही नुकसान होऊ शकत नाही. १४० ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नका, हे क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिले गेलेले असतात.

मात्र १४० किंवा कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास OTP सह आपली वैयक्तिक माहिती, बँक,डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स विचारल्यास आपली कोणतीही वैयक्तिक, बँक खात्याची माहिती,डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती, OTP/PIN देऊ नये, असं आवाहन सायबर विभागाने नागरिकांना केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा