गँगस्टर विकास दुबेच्या २ साथीदारांना ठाण्यातून अटक


गँगस्टर विकास दुबेच्या २ साथीदारांना ठाण्यातून अटक
SHARES

उत्तरप्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेच्या अन्य साथीदारांना महाराष्ट्र एटीएसच्या जुहू युनिटने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अरविंद एलियास गुद्दन त्रिवेदी आणि सुशील कुमार तथा सोनू तिवारी अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणानंतर या दोघांनी उत्तरप्रदेशमधून पळ काढत मुंबईत लपण्याचा प्रयत्न केला. माज्ञ एन्काऊन्टर स्पेशलिस्ट दया नायक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने या दोघांच्या मुस्क्या आवळल्याचे एटीएसकडून पोलिस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आठ पोलिसांच्या हत्ये प्रकरणातील प्रमुख विकास दुबे याच्या दोन साथीदारांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे. गुंड विकास दुबेचे दोन साथीदार कानपूर हत्या प्रकरणात महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जात आहे. विकास दुबेचे हे दोन साथीदार ठाण्यात असल्याची माहिती मिळताच मुंबई एटीएसने त्यांना अटक केली. मुंबईतील जुहू युनिटने ही कारवाई केली आहे. अरविंद एलियास गुद्दन त्रिवेदी आणि सुशील कुमार तथा सोनू तिवारी या दोघांना अटक केली आहे. एन्काउंटर  स्पेशल दया नायक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.  या दोघांचा ही ताबा लवकरच उत्तरप्रदेश पोलिसांना देण्यात येणार असल्याची माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे. हे दोघे ठाण्यात कुठे आणि कोणाकडे थांबले होते. त्यांना उत्तरप्रदेशमधून पळून जाण्यास कोणी मदत केली. त्या सर्वांची पोलिस चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय