'शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या, नाहीतर...'

  मुंबई  -  

  मुंबई - शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी, बैलगाडी शर्यत पुन्हा व्हावी अशा मागण्या घेऊन सांगलीच्या विजय जाधव या शेतकऱ्याने थेट मुंबई गाठलीये. सरकार कर्ज माफी द्यायला टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढ होतेय. ज्यांनी शेतात घाम गाळला, अशा शेतकऱ्यालाच सरकार विसरलं आहे, अशी टीका विजय जाधव यांनी सरकारवर केली आहे. 

  शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर मंत्री बघायलाही येत नाहीत. म्हणूनत शेतकऱ्याच्या प्रेताची प्रतिकात्मक अंतयात्रा त्याने या वेळी बरोबर आणली होती. बुधवारी ५ तारखेला विजय जाधव मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री जर भेटले नाहीत तर, प्रेताचे अंत्यसंस्कार मुख्यमंत्र्याच्या बंगल्यासमोरच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी विजय जाधव आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सांगलीत टॉवरवरही चढले  होते. त्यानंतरही सरकारने लक्ष न दिल्याने जाधव यांनी थेट मुंबई गाठली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.