Advertisement

ख्रिसमस, थर्टीफर्स्टची पार्टीकऱ्यांनो सावधान! भेसळयुक्त अन्नपदार्थ, दारू येऊ शकते वाट्याला


ख्रिसमस, थर्टीफर्स्टची पार्टीकऱ्यांनो सावधान! भेसळयुक्त अन्नपदार्थ, दारू येऊ शकते वाट्याला
SHARES

मुंबईकरांना आता वेध लागलेत ते ख्रिसमस आणि थर्डी फर्स्ट सेलिब्रेशनचे. बहुतेक मुंबईकरांनी त्यासाठी प्लानिंगही सुरू केलं असेल. पण या सेलिब्रेशनदरम्यान लज्जतदार मेजवानी आणि मद्याचा मनसोक्त आस्वाद घेताना थोडं सावध रहा. कारण या काळात अन्नपदार्थांसोबत दारूमध्ये भेसळ होण्याची दाट शक्यता असल्याचं अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए) ने स्पष्ट केलं आहे.


विशेष मोहीम हाती

भेसळयुक्त अन्नपदार्थ वा दारूतून विषबाधेसारख्या घटना घडत असल्याने ही भेसळ रोखण्यासाठी 'एफडीए' दरवर्षीप्रमाणे रेस्टाॅरन्ट, हाॅटेल्स, स्टाॅल, वाईन शाॅप्स आणि मिठाईच्या दुकानांवर करडी नजर ठेवणार अाहे. त्यासाठी 'एफडीए'ने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला येत्या शुक्रवारपासून१५ डिसेंबरपासून सुरूवात होणार असल्याची माहिती चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, (अन्न), 'एफडीए' यांनी दिली.


परवाना, नोंदणीची तपासणी

ख्रिसमस त्यातही थर्डी फर्स्टला मुंबईभर मोठ्या संख्येने पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. मग ती सोसायटीतील गच्ची असो वा पंचतारांकित हाॅटेल. या पार्ट्यांमध्ये भेसळयुक्त अन्न किंवा दारूमुळे विषबाधा होऊ नये यासाठी 'एफडीए' हाॅटेल, रेस्टाॅरन्ट, स्टाॅल, मिठाईच्या दुकानांची तपासणी करून तेथून अन्नाचे नमुने गोळा करणार आहे. या नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आल्यास दोषींविरोधात कारवाई करून अन्नाचा साठा नष्ट केला जाईल.


दारूचेही नमुने घेणार

थर्डी फर्स्टला मोठ्या प्रमाणावर दारू रिचवली जाते. साहजिकच दारूची मागणी या काळात वाढत असल्याने बनावट आणि भेसळयुक्त दारू बाजारात येते. त्यामुळे 'एफडीए' अन्न आणि दारू विक्रेत्यांकडे परवाना-नोंदणी आहे का? याचीही तपासणी करणार आहे. ती नसेल तर अशा विक्रेत्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्याचे आदेश 'एफडीए' आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी दिले आहेत.

ही मोहीम १ जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून यासाठी बृहन्मुंबई विभागाकडून विशेष पथक तयार करण्यात आल्याचंही साळुंखे यांनी सांगितलं. हे पथक शुक्रवारपासून मुंबईभर अन्नपदार्थ, अन्न आणि दारूचे नमुने घेणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा