Advertisement

मंत्रालयाच्या दारात पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न

५६ वर्षीय शेतकरी गुलाब शिंगारे यांनी दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयाच्या गेटवर अंगावर राॅकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी शिंगारे यांना वेळीच रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. दरम्यान मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शिंगारे यांना ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

मंत्रालयाच्या दारात पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न
SHARES

मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून, विष प्राशन करून वा आत्मदहनाचा प्रयत्न करत आत्महत्या करण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाहीत. हे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकार आणि पोलिसांकडून विशेष प्रयत्न होत असतानाही शुक्रवारी पुन्हा मंंत्रालयाच्या दारात एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

वेळीच रोखलं म्हणून...

५६ वर्षीय शेतकरी गुलाब शिंगारे यांनी दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयाच्या गेटवर अंगावर राॅकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिस आणि सुरक्षा रक्षकांनी शिंगारे यांना वेळीच रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. दरम्यान मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शिंगारे यांना ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

का आले होते मंत्रालयात?

शिंगारे हे लासलगावचे रहिवासी आहेत. पोलिस पाटील आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर अवैधरित्या कब्जा केल्याचा त्यांचा आरोप आहे. हीच कैफियत घेऊन शिंगारे मंत्रालायात आले होते.

महिन्याभरापूर्वी पॅरोलवर सुटलेल्या हर्षल रावले (३०) कैद्याने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. तर त्याआधी धर्मा पाटील यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. दरम्यानच्या काळात एका विद्यार्थ्याने निकाल वेळेत लावावेत यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

तर एका वृद्ध महिलेनेही औषध पित आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मंत्रालयाचं आत्महत्यालय, सुसाईड पाॅईंट झालंय का अशी जोरदार टिका होत आहे. त्यात शुक्रवारी आणखी एका घटनेची भर पडली.

हेही वाचा-

आत्महत्यालय! मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन कैद्याची आत्महत्या

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न: अविनाशच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा