आत्महत्यालय! मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन कैद्याची आत्महत्या


आत्महत्यालय! मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन कैद्याची आत्महत्या
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंत्रालयाचं 'आत्महत्यालय' झाल्याचं वक्तव्य करून २४ तास उलटत नाही, तोच या दाहक वक्तव्याची प्रचिती राज्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. एका तरूणाने गुरूवारी ६.१५ वाजेच्या सुमारास मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या प्रांगणात हा प्रकार घडताच तैनात सुरक्षा रक्षकांनी या तरूणाला तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सेंट जाॅर्ज रुग्णालयातील डाॅक्टरांनी स्पष्ट केलं.


नेमकं काय झालं?

आत्महत्या करणाऱ्या या दुर्देवी तरूणाचं नाव हर्षल रावते (३०) असं असून तो चेंबूरचा राहणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मंत्रालयीन कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत असताना अचानक मोठा आवाज झाला. कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धावत जाऊन बघितलं असता एक तरूण खाली पडलेला आढळून आला. या प्रकाराने मंत्रालय परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तरूणाला तात्काळ उचलून रुग्णालयात पाठवण्यात आलं.


जन्मठेपेची शिक्षा झालेला कैदी

रावते हा हत्येप्रकरणी पैठण जिल्हा खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याने आपल्या मेव्हणीचीच हत्या केली होती. तो काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर बाहेर आला होता. त्याच्या खिशात पोलिसांना महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाचं ओळखपत्र आणि एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत त्याने 'माय न्यायाधीश' नावाने अर्ज केला होता. शिक्षेला कंटाळून आत्महत्या केल्याचं यांत नमूद करण्यात आलं आहे.


आठवड्याभरातील दुसरी घटना

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर विधानभवनात गटनेत्यांची बैठक सुरू होती. त्यामुळे अजित पवार धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच मंत्रालयात धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करत हे सर्वजण सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या दिशेने निघाले.

धर्मा पाटील मृत्यूनंतर आठवड्यातील ही दुसरी घटना असल्यानं सरकारचं धाबं दणाणलं असून मंत्रालयाच्या सुरक्षेवर आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आहे एवढं नक्की.


हेही वाचा-

मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न: अविनाशच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी

मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांचे निधन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा