Advertisement

मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांचे निधन


मंत्रालयात विष प्राशन केलेले धर्मा पाटील यांचे निधन
SHARES

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले होते. या ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी अखेर जे.जे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतक-याचा दर्जा देण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात मिळत नाही तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचे त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी सांगितले.


अवयव करणार दान 

संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात हेलपाटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरण येथिल शेतकरी धर्मा पाटील यांनी गेल्या २२ तारखेला रात्री उशीरा मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांच्यावर जे. जे रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. यादरम्यान त्यांचे डायलिसीस करण्यात आले होते. धर्मा पाटील यांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येणार आहेत.


'तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही'

जमिनीचा योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.


उर्जामंत्र्यांनी केली विचारणा

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांची फोनवरून विचारणा केली. दरम्यान पाटील कुटुंबियांच्या मागण्यांचा सरकार सकारात्मक विचार करत आहे. योग्य मोबदला मिळणार असून अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकार घेईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा