Coronavirus cases in Maharashtra: 202Mumbai: 77Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 13Pimpri Chinchwad: 12Kalyan: 7Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Vasai-Virar: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 7Total Discharged: 34BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ५२ हजार प्रवाशांची तपासणी

४२५ विमानांमधून आलेल्या ५२,२२९ प्रवाशांची तपासणी

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ५२ हजार प्रवाशांची तपासणी
SHARE

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ४२५ विमानांमधून आलेल्या ५२,२२९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मंगळवापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया येथून ५२,२२९ प्रवासी दाखल झाले. त्यांपैकी २९७ प्रवासी महाराष्ट्र राज्यात आले आहेत. त्यांच्या तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांमध्ये ८७ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यांपैकी ८६ जणांचे वैद्यकीय नमुने तपासले असता त्यांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्या सर्वांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १ संशयित रुग्ण पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल आहे.

इथून पसरला कोरोना व्हायरस, खुद्द चीननेच केला खुलासा

धोकादायक कोरोना विषाणूच्या संक्रमणाने (Corono virus) चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. हा विषाणू जगभरातील अन्य देशांमध्येही हातपाय पसरत असल्याने सर्वजण चिंताग्रस्त झाले आहेत. साधारण महिन्याभरापूर्वी हा विषाणू चीनमध्ये (china) पसरण्यास सुरूवात झाली होती. पण हा विषाणू नेमका तयार झाला कसा? यामागे कुणाचा हात आहे? हे अद्याप अधिकृतरित्या कळलेलं नसलं, तरी चीनमधील एका वेबसाइटने यामागचा उलगडा केला आहे. या विषाणूची लागण होऊन जगभरात आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूवर अद्याप कुठलाही उपचार उपलब्ध नसल्याने या संख्येत आणखी भर पडण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

डाॅक्टर ली वेन लियांग यांनी महिन्याभरापूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओतून कोरोना विषणापासून (Corono virus) वाचण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. परंतु त्यांची माहिती खोटी असून अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं हाेतं. पण त्यांचा हा इशारा आता खरा ठरल्याचंच दिसत आहे. या पेक्षा भयानक बाब म्हणजे कोरोना विषाणूची लागण झालेल्या ३० हजार नागरिकांना मारण्यासाठी चीनी (china government) सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्याची जगभर चर्चा आहे. त्यातच हा विषाणू नक्की कुणाच्या इशाऱ्याने आणि कुठल्या उद्देशाने बनवण्यात आला याचा खुलासा एका चीनी वेबसाईटने केला आहे. जी न्यूज नावाच्या वेबसाईटने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार हा विषाणू डेयीन ग्यो (scientist deyin guo) नावाच्या वैज्ञानिकाने बनवला आहे. सार्स (sars virus) सारख्या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना विषाणूवर संशोधन सुरू होतं, असंही म्हटलं जात आहे. हा विषाणू बनवण्यासाठी त्यांना १० वर्षांचा कालावधी लागला. चीनचे उपराष्ट्रपती वांग की शान (wang qishan) यांनी या विषाणूचा हल्ला करण्याचे आदेश दिल्याचंही म्हटलं जात आहे. पण या बातमीला दुजोरा मिळू शकलेला नाही.


संबंधित विषय
ताज्या बातम्या