Advertisement

डोमेस्टीक एअरपोर्ट टर्मिनलच्या इमारतीला आग, कुणीही जखमी नाही


डोमेस्टीक एअरपोर्ट टर्मिनलच्या इमारतीला आग, कुणीही जखमी नाही
SHARES

डोमेस्टीक एअरपोर्ट टर्मिनलच्या इमारतीला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग टर्मिनल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील आयटी स्टोअर रूममध्ये लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नसून या आगीचा विमान उड्डाणावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

दुपारी तीनच्या सुमारास टर्मिनल इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून धूर येऊ लागला होता. त्यानंतर तात्काळ संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली तसेच अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यांनी चार फायर इंजिन आणि चार पाण्याच्या टॅंकरच्या मदतीने काही वेळातच या आगीवर ताबा मिळवला. या आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा