Advertisement

शाहरूखच्या बंगल्यासमोरील इमारतीला आग, एका महिलेचा मृत्यू

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यासमोरील सी स्प्रिंग नावाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

शाहरूखच्या बंगल्यासमोरील इमारतीला आग, एका महिलेचा मृत्यू
SHARES

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यासमोरील सी स्प्रिंग नावाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याचा वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टॅंड इथं मन्नत नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या अगदी समोर सी स्प्रिंग नावाची इमारत आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका २० वर्षांच्या इव्हाना मोरिस नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला असून सीफरा जाफरी नावाची ३८ वर्षांची महिला या आगीत होरपळून गंभीर जखमी झाली आहे. 

या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या त्वरीत घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. तसंच आगीत होरपळलेल्या दोघींना नजीकच्या भाभा रुग्णालयात दाखल केलं. तिथं मोरिस यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केलं. तर जाफरी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा