Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

दादरमध्ये कपड्याच्या दुकानाला लागली आग

मुंबईतील दादर मार्केटमधील (Dadar Market) कपड्याच्या एका दुकानाला आग (Fire) लागल्याची घटना घडली

दादरमध्ये कपड्याच्या दुकानाला लागली आग
SHARE

मुंबईतील दादर मार्केटमधील (Dadar Market) कपड्याच्या एका दुकानाला आग (Fire) लागल्याची घटना घडली. कपड्याच्या दुकानाला (Cloths Shop) लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (Fire brigade) ६ गाड्या दाखल झाल्या होत्या. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, ही आग नेमकी कशामुळं लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

या आगीमध्ये कोणत्याही जिवीतहानी झाल्याची माहिती अस्पष्ट आहे. तसंच, आग ही सकाळच्या सुमारास लागली होती. त्यामुळं जिवीतहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कपड्याच्या दुकानाला (Cloths Shop) आग लागल्यानं दुकानातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस (Police) नेमकी आग कशामुळं लागली याची चौकशी करत आहेत.

मुंबईत आगी लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी (Andheri) परिसरात मोठी आग लागली होती. त्यानंतर, माझगावमध्ये (Mazgaon) जीएसटी भवनच्या (GST Bhavan) इमारतीला मंगळवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली होती. सुमारे तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत ऑडिट रिपोर्ट (Audit Reports) आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.

बुधवारी डोंबिवलीमध्ये (Dombiwili) एमआयडीसी (MIDC) केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत आग लागली होती. ही कंपनी त्याच रस्त्यावर आहे जेथे काही दिवसांपूर्वी प्रदुषणामुळे रस्ते गुलाबी झाले होते. त्याच भागातील डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत ही भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.हेही वाचा -

'या' कारणासाठी उद्धव ठाकरे घेणार पंतप्रधानांची भेट

मुलांनो TikTok वर होताय 'आऊट ऑफ कंट्रोल', आता पालक करणार कंट्रोलसंबंधित विषय
ताज्या बातम्या