Advertisement

मुंबई सेंट्रलच्या कोरोना व्हायरस विलगीकरण केंद्रात आग

आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

मुंबई सेंट्रलच्या कोरोना व्हायरस विलगीकरण केंद्रात आग
SHARES

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल स्थित रिपन पॅलेस हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही जागा सध्या कोरोनाव्हायरस उपचारासाठी क्वारंटाईन ठेवण्याचे केंद्र म्हणून वापरली जात आहे. हे हॉटेल बेलासिस रोड इथं आहे. सध्या २५ रूग्ण या केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

हॉटेलच्या लॉजिंग रुमपर्यंत ही आग पसरली होती. अग्निशमन अधिकाऱ्यांना याची माहिती मंगळवारी २१ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५.३९ वाजता देण्यात आली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुख्य अग्निशमन अधिकारी पी.एस. रहांगडाले यांनी सांगितले की, रुग्णांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. सध्या आम्ही यासंदर्भात अधिक माहिती घेत आहोत. आम्हाला अधिक माहिती मिळाली तर ती तुमच्यापर्यंत पोहचवू.





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा