दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये आग

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर येथील अब्दुल रेहमान स्ट्रीट मार्गावर असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. सोमवारी सकाळी १०.५० वाजेच्या सुमरास ही आग लागली.

SHARE

दक्षिण मुंबईतील मशीद बंदर येथील अब्दुल रेहमान स्ट्रीट मार्गावर असलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमवारी सकाळी आग लागली. सोमवारी सकाळी १०.५० वाजेच्या सुमरास ही आग लागली. आगीच कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 


आगीचं कारण अस्पष्ट

अग्निशमन दलालकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ही आग लागली. आगीच कारणं अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


प्रसिद्ध मार्केट

अब्दुल रेहमान स्ट्रीट मार्गावरील क्रॉफर्ड मार्केट हे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध मार्केटमध्ये आहे. या मार्केट परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. दरम्यान, सोमवारी लागलेल्या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.


हेही वाचा -

भिवंडीत ब्रश कंपनीला भीषण आग

बहिण प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार संजय दत्तसंबंधित विषय
ताज्या बातम्या