भिवंडीत ब्रश कंपनीला भीषण आग

भिवंडीमधील काल्हेर गावातील जय माता दी कंपाऊंडच्या ब्रश कंपनीला भीषण आग लागली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

  • भिवंडीत ब्रश कंपनीला भीषण आग
SHARE

भिवंडीमधील काल्हेर गावातील जय माता दी कंपाऊंडच्या ब्रश कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्याचं कारण अद्याप समजलं नसून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या १२ वॉटर टॅंक घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 


ऑइल पेंट, ब्रशचा साटा

आग लागलेल्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ऑइल पेंट, ब्रशचा साटा असल्याची माहिती समोर येत. मात्र, या आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.


हेही वाचा -

बहिण प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार संजय दत्त

राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला अखेर मंजूरीसंबंधित विषय
ताज्या बातम्या