Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

प्रिया दत्त यांच्यासाठी संजय करणार रोड शो

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त मैदानात उतरणार आहे.

प्रिया दत्त यांच्यासाठी संजय करणार रोड शो
SHARES

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपच्या पूनम महाजन यांच्यात लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच आता प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ अभिनेता संजय दत्त मैदानात उतरणार आहे.


प्रिया दत्तसाठी रोड शो

प्रिया दत्त यांच्यासाठी संजय दत्त रोड शो करणार आहे. संजय दत्त ६ विधान सभा मतदारसंघात प्रिया दत्तसाठी रोड शो करणार आहे. सध्या प्रिया दत्त यांचा प्रचार हा लहान मोठ्या बैठका, डोर टू डोर प्रचार अशा पद्धतीनं सुरु आहे. उत्तर मध्य मुंबई या मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त टक्कर देणार आहेत. मागील निवडणुकीत प्रिया दत्त यांना पूनम महाजन यांनी पराभूत केलं होतं. त्यामुळं या निवडणुकीत त्या पुनम महाजन यांना पराभूत करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


वार्षिक कमाई १३.१३ कोटी

प्रिया दत्त यांची वार्षिक कमाई १३.१३ कोटी रुपये इतकी आहे. २०१४ साली शपथपत्रात त्यांनी त्यांची वार्षिक कमाई ५६.८६ लाख असल्याचं सांगितलं होतं. २०१४ साली दत्त यांच्याकडे ३.१९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती. त्यामध्ये वाढ होऊन आता त्यांच्याकडे १७.८४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर दत्त यांच्याकडे ६०.३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती, ती वाढून आता ६९.७७ कोटी रुपये झाली आहे.हेही वाचा -

राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला अखेर मंजूरी

दक्षिण मुंबईतील कॉग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखलRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा