Advertisement

मिलिंद देवरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुलेश्वर येथील भाषणात वादग्रदस्त विधान केल्याप्रकरणी शिवसेनेनं केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे.

मिलिंद देवरांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
SHARES

दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुलेश्वर येथील भाषणात वादग्रदस्त विधान केल्याप्रकरणी शिवसेनेनं केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यासमोरिल अडचणींमध्ये वाढ झाली आहे.


गुन्हा दाखल

निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मिलिंद देवरा यांना दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठविली होती. 'जैन मंदिराबाहेर शिवसेनेनं मांस शिजविल्याचं' विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडं करण्यात आली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगानं त्यांच्याविरोधात खोटं वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि १७१ आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात वाद निर्माण केल्याबद्दल भादंवि १२५ या कलमांनुसार एल टी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

दक्षिण मुंबईत जैन समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. तसंच शिवसेनेच्यावतीने अ‍ॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी ८ एप्रिल रोजी देवरा यांच्या विरोधात आयोगाकडं तक्रार केली होती. 



हेही वाचा -

राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेला अखेर मंजूरी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा