Advertisement

डोंबिवलीतल्या केमिकल कंपनीत आगीचं तांडव, परिसरात प्रचंड दुर्गंधी

डोंबिवलीतल्या केमिकल कंपनीत मंगळवारी दुपारी १.३० वाजता आग लागली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

डोंबिवलीतल्या केमिकल कंपनीत आगीचं तांडव, परिसरात प्रचंड दुर्गंधी
SHARES

डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. एवढंच नाही तर स्फोटाच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

केमिकल कंपनी असल्यामुळे आग झपाट्यानं वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. फेज टू मधील आग वाढली आहे. आजुबाजूच्या कंपन्यांतील कामगारांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पण गाड्यांना आत जाण्यासाठी अडथळा येत आहेत. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचण येत आहे.Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा