Advertisement

वांद्रे स्थानकाबाहेरील गरीब नगरची आग विझली, अग्निशमन दलाच्या जवानासह दोघेजण जखमी


वांद्रे स्थानकाबाहेरील गरीब नगरची आग विझली, अग्निशमन दलाच्या जवानासह दोघेजण जखमी
SHARES

वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नगर या अनधिकृत झोपडपट्टीविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना एका झोपडीत सिलिंडरचा स्फोट होऊन अचानक आग लागली. अग्निशमन विभागाने तब्बल ३ तासांहून अधिक काळ झुंज देत ही आग आटोक्यात आणली. या आगीत अग्निशमन दलाचे जवान अरविंद्र घाडगे (४३) यांच्यासह स्थानिक रहिवासी रिझवान सय्यद (४१) असे दोघेजण जखमी झाले आहेत. या दोघांवरही वांद्रे पश्चिमेकडील भाभा रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.   



कशी लागली आग?

वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे ट्रॅकला लागूनच गरीब नगर ही अनधिकृत झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरूवारी दुपारी कारवाईला सुरूवात केली. मात्र ही कारवाई सुरू असतानाच एका झोपडीत दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटातून लागलेली आग क्षणार्धात झोपडपट्टी आणि त्यालाच लागून असलेल्या वांद्रे पूर्वेकडील तिकीट घरापर्यंत पोहोचली. सुरक्षेचा उपाय म्हणून काही काळ हार्बर मार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली होती.


तिकीटघर जळून खाक

या आगीत झोपडपट्टीसह तिकीट घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या दाटीवाटीच्या वस्तीत पोहोचण्यास अडचण झाल्याने ही आग वाढली. अग्निशमन दलाने १६ फायर इंजिन, ८ वाॅटर टँकरच्या मदतीने ही चौथ्या क्रमांकाची आग ३ तासांनंतर आटोक्यात आणली.




काय म्हणतायत स्थानिक?

बुधवारी संध्याकाळी ५ वाजता आम्हाला नोटीस देण्यात आली होती. दोन दिवसांत घर खाली करा नाहीतर कारवाई करण्यात येईल, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. पण महापालिकेने दोन दिवस पूर्ण होण्या आधीच कारवाई केली आहे. यामुळे आमचं खूप नुकसान झालं आहे. लहान मुलांचे शाळेचे पुस्तक, घरचे समान सर्व आगीत खाक झालं आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा