Advertisement

मस्जिद बंदर परिसरातील जुम्मा मशिदीजवळील इस्माईल इमारतीला आग

ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

मस्जिद बंदर परिसरातील जुम्मा मशिदीजवळील इस्माईल इमारतीला आग
SHARES

मुंबईच्या (Mumbai) मस्जिद बंदर (Masjid Bunder) परिसरातील जुम्मा मशिदीजवळील (Jumma Masjid) इस्माईल इमारतीला (Ismail Building) आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागल्याचे समजत आहे. दरम्यान, अग्निशमनदलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमनदलाच्या ५ गाड्या आणि ४ जम्बो टॅकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या कोणत्याही जीवितहानीची नोंद नसून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याआधी २२ ऑगस्ट रोजी मुंबईच्या परळ परिसरातील हिंदमाता सिनेमाजवळ क्रिस्टल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता तर, इतर १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.

हेही वाचाः-अवघ्या १२ रुपयांत २ लाखांचं विमा संरक्षण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा