Advertisement

अवघ्या १२ रुपयांत २ लाखांचं विमा संरक्षण

सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना राबवत आहे.

अवघ्या १२ रुपयांत २ लाखांचं विमा संरक्षण
SHARES

आजच्या काळामध्ये आपल्याला १२ रुपयांमध्ये काय मिळेल याचा विचार करा. पाण्याच्या बाटलीची किंमतही १२ रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी त्याच १२ रुपयांमध्ये आपण वर्षासाठी दोन लाखांचे विमा संरक्षण मिळवू शकता. देशातील नागरिकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी मोदी सरकार ही सुविधा देत आहे.  सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना राबवत आहे. 

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत १८ ते ७० वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना केवळ १२ रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर अपघात विमा संरक्षण २ लाख रुपये दिले जाते.  विमा धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला २ लाख रुपये मिळतात. २०१५ मध्ये या योजनेची सुरूवात करण्यात आली. 

दोन्ही डोळ्यांचा वापर पूर्णपणे गमावणे किंवा दोन्ही हात व दोन्ही पायांचा वापर गमावणे यासारख्या कायमस्वरुपी अपंगत्वासाठी या योजनेत २ लाखांचे संरक्षण दिले जाते. त्याचबरोबर कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व असल्यास विम्याचे संरक्षण १ लाख रुपये आहे. योजनेचा फॉर्म ऑनलाईन किंवा बँकेत जाऊन भरू शकता. कोणत्याही बँकेद्वारे हा विमा घेऊ शकता. सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खासगी बँकांनीही आपल्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. थेट बँक खात्यातून पैसे डेबिट केले जातात. 

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत १८ ते ५० वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना ३३० रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर दोन लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रीमियमची ही रक्कम खातेदाराच्या संमतीने बँक खात्यातून डेबिट केली जाते.

 प्रीमियम पॉलिसीधारकाच्या बँक खात्यातून प्रत्येक वर्षाच्या ३१ मे पर्यंत डेबिट होतात. त्याचे प्रीमियम दर वर्षी भरावे लागते. म्हणजे पॉलिसीधारकाने १ जूनपूर्वी प्रीमियम भरला पाहिजे. योजना घेतल्यानंतरी जोखीम संरक्षण ४५ दिवसानंतर सुरू होते. ही पॉलिसी पूर्णपणे टर्म पॉलिसी आहे आणि पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे उद्दीष्ट आहे.



हेही वाचा -

ज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज

पर्सनल लोन घेताय? जाणून घ्या बँकांचे व्याजदर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा