Advertisement

पर्सनल लोन घेताय? जाणून घ्या बँकांचे व्याजदर

पर्सनल लोनसाठी बँकेची निवड करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कारण इतर कर्जापेक्षा पर्सनल लोनवरील व्याज दर जास्त आहे.

पर्सनल लोन घेताय? जाणून घ्या बँकांचे व्याजदर
SHARES

कोरोनाच्या काळात नोकरी गमावल्यामुळे व वेतन कपात झाल्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी बँका कमी व्याज दरावर पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) देत आहेत. मात्र, पर्सनल लोनसाठी बँकेची निवड करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.  कारण इतर कर्जापेक्षा पर्सनल लोनवरील व्याज दर जास्त आहे.  

पर्सनल लोन घेताना कर्जदाराने प्रथम व्याजाची माहिती मिळविली पाहिजे. कोणती बँक सर्वात कमी व्याज दराने कर्ज देत आहे हे पाहणं अत्यावश्यक आहे. मात्र, पर्सनल लोनसाठी अर्ज करताना क्रेडिट स्कोअर खूपच महत्त्वाचा असतो. जर क्रेडिट स्कोअर अधिक चांगला असेल कर्ज मिळण्यात फारशी अडचण येत नाही. कर्जाची रक्कम तुमची कमाई, कर्ज, री-पेमेंट क्षमता आदी बाबींवर अवलंबून आहे.

असे आहेत बँकांचे व्याजदर

बँक
व्याज दर (%)
प्रोसेसिंग फी (टॅक्ससह)
यूको बँक
१०.५० - १०.७५
कर्ज रकमेच्या १ टक्के+GST
एचडीएफसी बँक
१०.७५ - २१.३०
कर्ज रकमेच्या २.५० टक्केपर्यंत
बँक ऑफ इंडिया
१०.३५ - १२.३५
कर्ज रकमेच्या २ टक्के
बँक ऑफ बडोदा
१०.१० - १५.१०
कर्ज रकमेच्या २ टक्के
स्टेट बँक ऑफ इंडिया
९.६० - १५.६५
कर्ज रकमेच्या १ टक्के
इंडियन ओवरसीज बँक
९.६० - १२.०५
कर्ज रकमेच्या ०.७५ टक्के
यूनियन बँक ऑफ इंडिया
९.३० - १३.४०
कर्ज रकमेच्या ०.५० टक्के+ GST
इंडियन बँक
९.२० - १३.६५
निश्चित नाही
आयडीबीआय बँक
८.९० - १३.५९
कर्ज रकमेच्या १ टक्के + GST
पंजाब नॅशनल बँक
८.६० - ११.६५
कर्ज रकमेच्या १ टक्के + GST
कॅनरा बँक
८.५० - १३.९०
कर्ज रकमेच्या १ टक्के + GST
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
८.३५ - १०.२०
५०० रुपयेपर्यंत + टॅक्सहेही वाचा -

आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गृहकर्ज, बँकांचे 'असे' आहेत व्याजदर

६ महिन्यांसाठीही 'या' बँकांत करता येणार एफडीसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा