Advertisement

ज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज

कर बचतीसाठी मुदत ठेव (एफडी) एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. आयकर कायद्याच्या कलम ८० सी एफडीमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेतली जाऊ शकते.

ज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर 'या' बँका देत आहेत 'इतकं' व्याज
SHARES

कर बचतीसाठी मुदत ठेव (एफडी) एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. आयकर कायद्याच्या कलम ८० सी एफडीमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेतली जाऊ शकते. अशा परिस्थितीत आपण ज्येष्ठ नागरिक असाल किंवा आपण आपल्या पालकांसाठी गुंतवणूकीचा विचार करीत असाल तर आम्ही आपल्याला अशा काही बँकांबद्दल सांगत आहोत जेथे आपण गुंतवणूक केल्यास कर बचत एफडीवर ७ टक्के पेक्षा जास्त मिळेल. 

आयडीएफसी फर्स्ट बँक 

आयडीएफसी फर्स्ट बँकेत ज्येष्ठ नागरिकांना कर बचत एफडीवर ७.२५ टक्के व्याज मिळते. म्हणजेच, जर आपण या बँकेत ५ वर्षांसाठी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आपल्याला १,४१,९०१ रुपये मिळतील.

येस बँक 

ही बँक ज्येष्ठ नागरिकांना कर-बचत एफडीवर ७.२५ टक्के व्याज देत आहे. म्हणजेच, जर आपण या बँकेत ५ वर्षांसाठी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आपल्याला १,४१,९०१ रुपये मिळतील. 

इंडसइंड बँक 

या बँकेत ५ वर्षांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज मिळेल. म्हणजेच, जर आपण या बँकेत ५ वर्षांसाठी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आपल्याला १,४१,९०१ रुपये मिळतील. 

आरबीएल बँक

 ही बँक ज्येष्ठ नागरिकांना कर-बचत एफडीवर  ७.२५ टक्के व्याज देत आहे. जर आपण या बँकेत ५ वर्षांसाठी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आपल्याला १,४१,९०१ रुपये मिळतील. 

एयू स्मॉल फायनान्स बँक 

ही बँक ज्येष्ठ नागरिकांना कर-बचत एफडीवर ७ टक्के व्याज देत आहे. म्हणजेच, जर आपण या बँकेत ५ वर्षांसाठी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर आपल्याला १,४०,२५५ रुपये मिळतील. हेही वाचा -

केकेआर रिलायन्स रिलेटमध्ये गुंतवणार ५५५० कोटी

एसबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज पुनर्रचना सुविधा सुरुसंबंधित विषय
Advertisement