Advertisement

एसबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज पुनर्रचना सुविधा सुरु

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने (State Bank of India एसबीआय) आपल्या किरकोळ कर्जदारांना आणि गृहकर्जदारांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे.

एसबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज पुनर्रचना सुविधा सुरु
SHARES

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने (State Bank of India एसबीआय) आपल्या किरकोळ कर्जदारांना आणि गृहकर्जदारांना दिलासा देत मोठी घोषणा केली आहे. एसबीआयकडून कर्जदाराला कर्ज फेडण्यासाठी दोन वर्षांचा अधिक कालावधी देण्यात येईल किंवा कर्जाची पुनर्रचना (Restructuring of Loan account)  करून त्याचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढवणार आहे. 
 

स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सी.एस. शेट्टी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.  कर्जदारांना बँकेच्या वेबसाईटवरुन या योजनेसाठी पात्रता तपासून घेता येणार आहे. कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी कर्जदाराच्या उत्पन्नाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच भविष्यात तो कर्जफेड करेल का याची खातराजमा करूनच ही सुविधा कर्जदाराला दिली जाणार आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहकांना ६ महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. ही सुविधा कोणत्या ग्राहकाला ६ महिन्यांसाठी मिळेल आणि कोणाला २ वर्षांसाठी हे सर्व बाबी पडताळल्यानंतरच समजणार आहे. लोकांना कर्जाची पुनर्रचना समजावण्यासाठी बँकेनं ऑनलाइन पोर्टलही लाँच केलं आहे.  एसबीआयच्या वेबसाईटवर  तुम्हाला Restructuring of Loan account साठी वेगळं पोर्टल दिसेल. तिथं आपला लोन अकाऊंट नंबर टाकल्यानंतर तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे समजेल. तुम्ही जर तुम्हाला ईएमआयचा कालावधी वाढवून हवा असेल, तर त्याची माहितीदेखील या ठिकाणी मिळेल.    



हेही वाचा -

गुगल प्ले स्टोअरवर Paytmची वापसी

कार्लाइल ग्रुप रिलायन्स रिटेलमध्ये करणार १५ हजार कोटींची गुंतवणूक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा