Advertisement

गुगल प्ले स्टोअरवर paytmची वापसी

गँबलिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे गुगलनं पेटीएमला प्ले स्टोअरवरून हटवलं होतं. आता चार तासानंतर परत पेटीएम प्ले स्टोअरवर वापस आलं आहे.

गुगल प्ले स्टोअरवर paytmची वापसी
SHARES

डिजिटल व्यवहारातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पेटीएम अ‍ॅपची गुगल प्ले स्टोअरवर वापसी झाली आहे. पेटीएमनं ट्वीट करून याबाबत माहिती दिली. गँबलिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्यामुळे गुगलनं पेटीएमला प्ले स्टोअरवरून हटवलं होतं. आता चार तासानंतर परत पेटीएम प्ले स्टोअरवर वापस आलं आहे.

प्ले स्टोरवर पुन्हा येताना पेटीएमने आपलं रूप बदललं आहे. नव्या रूपात हे अ‍ॅप आलं आहे. त्यामध्ये काही बदल कंपनीनं केले आहेत. नवे बदल करून पेटीएम अ‍ॅप पुन्हा प्ले स्टोरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

गुगलनं म्हटलं आहे की, ते ऑनलाइन कसीनोला परवानगी देऊ शकत नाही. तसंच, स्पोर्ट्स बेटिंगची सुविधा देणाऱ्या अवैध गँबलिंगचंही समर्थन नाही करणार. गुगलच्या वाइस प्रेसीडेंट प्रोडक्ट, अँड्रॉयड सिक्योरिटी आणि प्रायवसी सुजैन फ्रेने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गुगलच्या पॉलिसीजचे उल्लंघन करणाऱ्या अॅप्सला आम्ही प्ले स्टोअरमध्ये राहण्याची परवानगी देऊ शकत नाही.

"आम्ही नुकतंच आमच्या ग्राहकांसाठी Paytm Cricket League लाँच केलं होतं. जे क्रिकेटबाबत ग्राहकांचा असलेला उत्साह पाहता त्यांना कॅशबॅक जिंकण्यासाठी देण्यात होतं. पेटीएमएवर हे नियमांनुसारच आहे. मात्र तरी आपण कॅशबॅक कंपोनंट तात्पुरत्या स्वरूपात हटवलं आहे, जेणेकरून गुगलच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही", अशी माहिती पेटीएमने आपल्या ब्लॉगवर दिली.

पेटीएम देशातील सर्वात मुल्यवान स्टार्टअप्सपैकी एक आहे. गुगलचे पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल-पे सोबत पेटीएमची थेट टक्कर आहे. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये पेटीएमचा रेव्हेन्यू वाढून 3,629 कोटींवर पोहचला होता.हेही वाचा

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक करणार ७५०० कोटींची गुंतवणूक

एसबीआय यंदा भरणार १४ हजार जागा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा