गुगलनं प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप काढून टाकला आहे. गुगलनं यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे की, हे अॅप खेळांसंदर्भातील नियमांचं उल्लंघन करून खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही. कसिनोसारख्या सेवा पुरवणं नियमांमध्ये बसणारं नाही, असंही गुगलनं स्पष्ट केलं आहे.
गुगलनं पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अॅपवरही कारवाई केली आहे. गुगलनं म्हटलं आहे की,“आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अॅपला परवानगी देत नाही.
एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे.”
Dear Paytm'ers,
— Paytm (@Paytm) September 18, 2020
Paytm Android app is temporarily unavailable on Google's Play Store for new downloads or updates. It will be back very soon.
All your money is completely safe, and you can continue to enjoy your Paytm app as normal.
गुगलनं Paytm काढून टाकल्यानं अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण paytm जवळपास ५ कोटीहून अधिक या अॅपचे वापरकर्ते आहेत. त्यामुळे paytmमध्ये असणाऱ्या पैशांचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण यावर पेटीएमनं म्हटलं आहे की, "त्यांचे Android अॅप सध्या डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. परंतु ते लवकरच परत येईल. आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत."
मीडिया रिपोर्टनुसार, पेटीएमसाठी ही समस्या त्याच्या आयपीएलशी संबंधित जाहिरातींमुळे उद्भवली आहे. पेटीईएमची पदोन्नती चालू होती, ज्यामध्ये ते वापरकर्त्यांना खर्चानं क्रिकेट कार्ड जमा करण्यासाठी कॅशबॅक ऑफर करीत होते. सूत्रांच्या माहितीनुसार इतर बऱ्याच कंपन्याही अशा जाहिराती घेत आहेत. आता पेटीएम जाहिरात बंद करेल, त्यानंतर अॅप पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर येऊ शकते.
गुगलनं म्हटलं आहे की, जर एखादे अॅप वापरकर्त्यांना दुसर्या वेबसाइटवर घेऊन गेला, जेथे पेड टूर्नामेंटमध्ये भाग घेऊन ते वास्तविक पैसे किंवा रोख पारितोषिक जिंकू शकतात, तर हे देखील प्ले स्टोअरच्या नियमांचं उल्लंघन आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्यापूर्वी गूगलची ही कृती इतर अॅप्ससाठी देखील चिंतेची आहे.
आयपीएलच्या शेवटच्या हंगामात असं दिसून आलं की, सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या किंवा लोकांना त्यात भाग घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या अॅप्सच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात स्पोर्ट्स सट्टेबाजीवर बंदी आहे, परंतु बर्याच राज्यांत या खेळांवर कोणतेही बंधन नाही. या खेळांमध्ये, वापरकर्ते त्यांचे आवडते खेळाडू निवडतात आणि त्यावर पैसे गुंतवतात. जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करतात तेव्हा ते जिंकतात.
हेही वाचा