Advertisement

भारताचा जीडीपी निगेटिव्ह राहणार - एस अँड पी

मार्च ते जून २०२० या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था तब्बल २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. लॉकडाऊनमुळे खासगी क्षेत्रातील खरेदीक्षमता २६.७ टक्क्यांनी तर स्थिर गुंतवणूक ४७.१ टक्क्यांनी घसरली.

भारताचा जीडीपी निगेटिव्ह राहणार - एस अँड पी
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. भारताचा जीडीपी वजा २३ वर पोहोचला आहे. हा जीडीपी आणखी खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताची अर्थव्यवस्था तब्बल टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज जागतिक पतमानांकन संस्था एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने व्यक्त केला आहे. या आधी संस्थेने भारताची अर्थव्यवस्था पाच टक्क्यांनी घटेल असा अंदाज वर्तवला होता. 


मार्च ते जून २०२० या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्था तब्बल २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. लॉकडाऊनमुळे खासगी क्षेत्रातील खरेदीक्षमता २६.७ टक्क्यांनी तर स्थिर गुंतवणूक ४७.१ टक्क्यांनी घसरली. जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाची साथ सुरूच राहणार असल्यामुळे आर्थिक वाढीला आळा बसणार असल्याचा अंदाज एस अँड पीने वर्तवला आहे.  


औद्योगिक व्यवहार सुरळित होत असले तरी उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच राहणार असल्यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत जीडीपीची वाढ निगेटिव्ह राहणार असल्याचा अंदाज एस अँड पीने वर्तवला आहे.


हेही वाचा -

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक करणार ७५०० कोटींची गुंतवणूक

एसबीआय यंदा भरणार १४ हजार जागाRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement