Advertisement

एसबीआय यंदा भरणार १४ हजार जागा

एसबीआयनं सांगितलं की, कर्मचाऱ्यांबाबत बँक नेहमीच सकारात्मक आणि अनुकूल राहिली आहे. बँक आपला व्यवसाय वाढवत आहे त्यामुळेच यंदा १४ हजार जागांची भरती केली जाणार आहे.

एसबीआय यंदा भरणार १४ हजार जागा
SHARES
देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) यंदा १४ हजार जागा भरणार आहे. पुढील ३ महिन्यात या जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. भरती करण्याच्या घोषणेआधी एसबीआयने कर्मचाऱ्यांसाठी स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) आणण्याची देखील घोषणा केली आहे.एसबीआयने या भरतीबाबत म्हटलं आहे की,  व्यवहार अधिक विस्तारीत करण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे १४  हजार नवीन लोकांची भरती केली जाणार आहे.  ही भरती व्हीआरएसमुळे (स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजनेनंतर) नसल्याचंही एसबीआयने स्पष्ट केलं आहे.

एसबीआयनं सांगितलं की, कर्मचाऱ्यांबाबत बँक नेहमीच सकारात्मक आणि अनुकूल राहिली आहे. बँक आपला व्यवसाय वाढवत आहे त्यामुळेच यंदा १४ हजार जागांची भरती केली जाणार आहे. सध्या एसबीआयमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱी कार्यरत आहेत.


एसबीआयने कर्मचाऱ्यांकरता नवीन VRS2020 अशी योजना आणली होती. सेवेची  २५ वर्षे पूर्ण झालेले आणि  वयाची ५५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील एसबीआयच्या कर्मचाऱ्यांना योजनेत सहभाग घेता येणार आहे. ही योजना १ डिसेंबर ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत असणार आहे. 


जे कर्मचारी ही वीआरएस स्विकारणार आहेत. त्यांना वास्तविक रिटायरमेंट तारखेपर्यंतच्या कालावधीकरता वेतनाच्या ५० टक्के एक्स ग्रेशियाच्या रुपात दिले जाणार आहे. याचप्रमाणे ग्रॅज्युटी, पेंशन, भविष्य निधी आणि मेडिकल बेनिफिट्सचा देखील फायदा होणार आहे. 



हेही वाचा -

Vodafone-Idea ला मिळालं नवं नाव, पण ग्राहकांना भुर्दंड

पंजाब नॅशनल बँकेचं गृह, वाहन कर्ज महागलं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा