माटुंग्यातील बिग बझारला भीषण आग


  • माटुंग्यातील बिग बझारला भीषण आग
SHARE

माटुंग्यातील बिझ बझार सुपरमार्केटला सोमवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ३ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 


माटुंगा पश्चिमेकडील तुलसी पाईप रोड, हनुमान नगर इथं हे बिग बझार आहे. संध्याकाळच्या ५ वाजून ७ मिनिटांच्या सुमारास ही आग लागली. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर बिग बाजार असून कपडे तसंच गृहोपयोगी साहित्यामुळे आग वेगाने पसरली. एक मजल्याच्या इमारतीला लागलेल्या या आगीत कुणालाही दुखापत झालेली नाही. बिग बझारमध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

ही आगशॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहेया बिग बझारच्या शेजारीच रहिवासी इमारती  असून आगीच्या धुराचे लोट या इमारतीमध्ये जाऊन रहिवाशांना त्रास होत आहे. आग लागली त्याजागी  मॅग्नेट मॉल होता वर्ष दीड वर्षांपूर्वी  बिग बाझार सुरू करण्यात आला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या