SHARE

मुंबईतल्या वांद्रे येथील एमटीएनएल (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड)च्या इमारतीला दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या आगीत अंदाजे ५० ते ५५ जण अडकले होते. या सर्वांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

वांद्रे पश्चिमेकडील के. सी. मार्गावर असलेल्या एमटीएनएल इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली. ही इमारत एकूण ९ मजल्यांची आहे. ही आग लेव्हल ४ ची असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा तसंच अडकलेल्या कर्मचाऱ्यांनाबाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

आगीचं कारण अस्पष्ट असून या आगीत अद्याप कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.

संबंधित विषय
ताज्या बातम्या