Advertisement

कांजूरमार्गचा सिनेव्हिस्टा स्टुडिओ जळून खाक, एकाचा मृत्यू


कांजूरमार्गचा सिनेव्हिस्टा स्टुडिओ जळून खाक, एकाचा मृत्यू
SHARES

कांजूरमार्गच्या सिनेव्हिस्टा स्टुडिओला शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग लागली तेव्हा स्टुडिओमध्ये बेपनाह मालिकेचं शुटिंग सुरु होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचं काम हाती घेतलं. मात्र आग विझेपर्यंत संपूर्ण स्टुडिओ आगीत जळून खाक झाला.


ऑडिओ असिस्टंटचा होरपळून मृत्यू

या आगीमध्ये गोपी वर्मा या व्यक्तीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोपी वर्मा हे सिनेव्हिस्टा स्टुडिओमध्ये ऑडिओ असिस्टंटचं काम करत होते. आग विझल्यानंतर जेव्हा अग्निशमन विभागाचे जवान आत गेले, तेव्हा गोपी वर्मा यांचं संपूर्ण शरीर जळालेल्या अवस्थेत दिसलं. त्यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.


भंगारातल्या लाकडामुळे लागली आग

तिसऱ्या क्रमांकाची ही आग लागली तेव्हा स्टुडिओत किमान 150 लोक होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना सुरक्षितरीत्या बाहेर काढलं. स्टुडिओचे बांधकाम वन प्लस वन आहे. स्टुडिओच्या मागील बाजूस भंगारातलं लाकडी डेकोरेशनचं सामान होतं. त्याला ही आग लागली. रेल्वे रुळाच्या बाजूला या स्टुडिओची मागील बाजू येते. लाकडी प्लायवूडचा सेटअप असल्याने आग जास्त भडकली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा