अंधेरीतल्या पेनिन्सुला पार्क इमारतीला आग

वीरा देसाई रोडलगत असलेल्या पेनिन्सुला पार्क इमारतीला ही आग लागल्याची घटना घडली आहे.

SHARE

मुंबईच्या अंधेरीतील व्यावसायिक इमारतीला दुपारच्या सुमारास आग लागली. वीरा देसाई रोडलगत असलेल्या पेनिन्सुला पार्क इमारतीला ही आग लागल्याची घटना घडली आहे. ही इमारत २२ मजली असून इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली. 

दुपारी १२.३० च्या सुमारास ही आग लागली. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीच्या अहवालानुसार, या इमारतीत अनेक लोक अडकले होते. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. यात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.


संबंधित विषय
ताज्या बातम्या