Advertisement

ताडदेव इथं उषा किरण इमारतीतील कारला आग

ताडदेव येथील उषा किरण इमारत परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका कारला अचानक आग लागली.

ताडदेव इथं उषा किरण इमारतीतील कारला आग
SHARES

ताडदेव येथील उषा किरण इमारत परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका कारला अचानक आग लागली. या आगीत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान ताबडतोब घटनास्थळी आले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

ही आग नेमकी कशी लागली याबद्दल माहिती मिळू शकली नसली, तरी या आगीत कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. काही दिवसांपूर्वीच नरिमन पाॅईंट येथील बँक आॅफ बहरीन अँड कुवेत या बँकेच्या कार्यालयाला तसंच इतर तीन कार्यालयांना आग लागली होती. या आगीत कार्यालयातील कुणालाही दुखापत झाली नसली, तरी ही आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान धुरात कोंडून बेशुद्ध पडला हाेता.  

जाॅली मेकर चेंबर २ या १५ मजल्याच्या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर या बँकेचं कार्यलय होतं. या आणि इतर कार्यालयांना सकाळी सव्वापाच वाजता ही आग लागली होती.

तर, लोअर परळ येथील रघुवंशी मिल कंपाऊंड येथील तीन मजल्यांच्या व्यावसायिक इमारतीत देखील मोठी आग लागली होती. मिल कंपाऊंड परिसरात पी २ नावाच्या इमारतीतील ग्राऊंड फ्लोअरवर सकाळी ९ वाजता ही आग लागली हाेती. त्यानंतर आगीच्या ज्वाळांनी ही आग वरच्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली होती.    

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा