Advertisement

महालक्ष्मीमध्ये इमारतीला भीषण आग


महालक्ष्मीमध्ये इमारतीला भीषण आग
SHARES

महालक्ष्मीमधल्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. विठ्ठल निवास असं या इमारतीचं नाव आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचं पाहायला मिळत आहे.

आग इतकी भीषण आहे की, परिसरात सर्वत्र धुरांचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. ३ अग्निशमन गाड्या, ३ पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


आग लागलेल्या इमारतीमधून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या आगीत आतापर्यंत कोणीही मृत अथवा जखमी झाले नाहीये. इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात येत आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा