Advertisement

पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग, 'या' बेस्ट बसेसचे मार्ग बदलले

आगीच्या घटनेनंतर त्या मार्गावरील बेस्ट बसेस दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग, 'या' बेस्ट बसेसचे मार्ग बदलले
SHARES

पवईच्या हीरानंदानी (Hiranandani Powai Area) मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आगल्याची माहिती मिळत आहे. सकाळी सहा वाजण्याच्या आसपास आग लागल्याची घटना घडली. आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला लागलेली आग खूपच भीषण आहे. अद्यापही आग धुमसतीच आहे. अग्निशमन दलाला लेव्हल 2 चा कॉल देण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या उपस्थित आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

दरम्यान आगीच्या घटनेनंतर त्या मार्गावरील बेस्ट बसेस दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. 

हिरानंदानी येथील हायको सुपर मार्केट येथे आग लागल्यामुळे बस मार्ग क्रमांक 392, 409 ,418, 423 हे थेट शेट्टी विद्यालय येथे जातील .या परावर्तनामुळे फॉरेस्ट ट्रिट व फॉरेस्ट क्लब हे दोन बस स्टॉप वगळले जातील. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा