Advertisement

भेंडी बाजार परिसरातील इमारतीला आग


भेंडी बाजार परिसरातील इमारतीला आग
SHARES

मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील एका इमारतीमधील दुकानाला आग लागल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळीच्या सुमारास ही आग लागली असून, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इस्माइल इमारतीमधील दुकानाला आग लागल्याचं समजतं. या आगीत दुकानातील अनेक सामान जळून खाक झालं आहे. 

आगीच कारण अस्पष्ट

दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवलं असलं तरी अद्याप आगीच कारण अस्पष्ट आहे.  

गाड्यांच नुकसान

इमारतीमधील दुकानाला लागलेल्या आगीचं प्रमाण जास्त असल्यानं परिसरातील २ कार आणि मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत. या आगीप्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केला असून, अाजुबाजूचा परिसर खाली करण्यास सांगितल्याचं समजतं. या आगीच कारण अस्पष्ट असलं तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेही वाचा -

व्हॉट्सअप हेरगिरी थांबवा, धनंजय मुंडे यांचं राज्यपालांना पत्र

लोहपुरूषाला महाराष्ट्र पोलिसांकडून अनोखी मानवंदनाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा