Advertisement

वाणगाव-डहाणूदरम्यान मालगाडीला आग


वाणगाव-डहाणूदरम्यान मालगाडीला आग
SHARES

पश्चिम रेल्वेवरील वाणगाव आणि डहाणू रोड दरम्यान मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांची वाहतूक डहाणू रेल्वे स्थानकापर्यंतच सुरू आहे.

या आगीमुळे विरार, बोरिवली लोकल सेवा आणि मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या काही लांब पल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही रेल्वे गाड्यांची वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.


मोठा अनर्थ टळला

गुरुवारी रात्री मालगाडीच्या दोन डब्यांना अचानक आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच दाखल होत आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी आगीमुळे ओव्हरहेड वायर तुटल्याने डहाणू-विरार मार्गावरील वाहतूक ठप्प झाल. सध्या ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा