Advertisement

इमारतीच्या वीज मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे महिलेचा मृत्यू


इमारतीच्या वीज मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे महिलेचा मृत्यू
SHARES

बोरीवली पश्चिम शिंपोलीजवळील धरम क्षेत्र इमारतीमध्ये वीज मीटर बॉक्समध्ये शॉटसर्कीट झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. यामुळे निर्माण झालेल्या धुराच्या त्रासामुळे नागरिकांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे दोन महिलांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील जया गरजिया (५५) या महिलेला मृत घोषित करण्यात आले आहे.


शनिवारी संध्याकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळत असतानाच बोरीवली पश्चिम इथल्या शिंपोलीजवळील धरम क्षेत्र इमारत क्रमांक ३च्या मीटर बॉक्समधून धूर येऊ लागला. शॉर्टसर्कीटमुळे निर्माण झालेल्या या धुराचा त्रास रहिवाशांना जाणवू लागला. या धुरामुळे जया गरजिया आणि लक्ष्मी येरोला या दोन महिलांना अधिकप्रमाणात त्रास जाणवू लागल्यानं त्यांना त्वरीत शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दोघांपैकी जया गरजिया हिचा मृत्यू झाला असून लक्ष्मी येरोला यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयानं स्पष्ट केलं.हेही वाचा

आग लागल्यावर सर्वात आधी 'हे' करा!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा