Advertisement

आग लागल्यावर सर्वात आधी 'हे' करा!

नुकतीच प्रभादेवीतील ब्यूमाँड इमारतीच्या ३२ आणि ३३ व्या मजल्याला आग लागली. या आगीनं बघता बघता रौद्र रूप धारण केलं. परंतु येणाऱ्या काळात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वात आधी घरात शॉर्टसर्किट होऊ नये म्हणून खालील खबरदारी घेणं आवश्यक आहे.

आग लागल्यावर सर्वात आधी 'हे' करा!
SHARES

गॅस सिलिंडरचा स्फोट, पाइप गॅसची अव्यवस्थित हाताळणी, शॉट सर्किट यांमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. यामध्ये शॉट सर्किटमुळे आग लागण्याचं प्रमाण अधिक आहे.

नुकतीच प्रभादेवीतील ब्यूमाँड इमारतीच्या ३२ आणि ३३ व्या मजल्याला आग लागली. या आगीनं बघता बघता रौद्र रूप धारण केलं. परंतु येणाऱ्या काळात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वात आधी घरात शॉर्टसर्किट होऊ नये म्हणून खालील खबरदारी घेणं आवश्यक आहे. ही खबरदारी घेतली तर आग लागण्याच्या प्रमाणात नक्कीच घट होईल.

1) वायरिंगमध्ये अनेकदा सैल जोड कनेक्शन असतात. हे जोड सैल असल्यानं उंदीर वायर कुरतडतो. त्यामुळे हळूहळू स्पार्किंग सुरू होतं.

2) कुठलेही विद्युतीकरणाचे कंत्राट  देताना त्या व्यक्तीचे तसंच त्याच्याकडे काम करत असलेल्या वायरमनचे लायसन्स अधिकृत आहे का हे तपासणं. मान्यताप्राप्त किंवा महाराष्ट्र शासनाच्या कंञाटदारालाच विद्युतीकरणाचे कंत्राट द्यावं.

3) नॅशनल इलेक्ट्रिक कोड २०११ प्रमाणे वायरिंगचं आयुष्य २० ते २५ वर्ष असते. त्यामुळे घरगुती वायरिंगला २० वर्षे झाली की विद्युत कंत्राटदाराकडून चाचण्या करून घेणं. २५ वर्षे झाली असतील तर वायर बदललेली चांगली. वायरिंग जुनी झाली किंवा विजरोधक आवरण खराब झालं किंवा इतर काही कारणास्तव शॉटसर्किट झालं, तर वायर अतिशय गरम होतात आणि जळतात.

4) अनेकदा ग्राहक एका प्लगला एक मल्टिप्लग लावून त्याला दोन-तीन उपकरणे जोडतात. एका प्लगसाठी मेन जी वायर आणलेली असते ती तेवढाच लोड सहन करते. जास्त उपकरणे जोडण्याच्या नादात मेन वायर ओव्हरलोड होेते. यामुळे वायर गरम होऊन आगीला सुरुवात होते. त्यामुळे इमारतीतल्या प्रत्येक खोलीत जास्तीत जास्त प्लग आउटलेट्स असणं आवश्यक आहे.

5) वीज कंपनीचे मीटररूम हे इमारतीच्या जिन्याखाली अगदी कमी जागेत उभारले जाते. हे चुकिचं आहे. मीटर रूमही पूर्णपणे वेगळी असणं आवश्यक आहे.



आग लागल्यावर काय करावं?

1) आगीसारख्या घटनांमध्ये सर्वांनीच जागरूक असायला हवं. कुठेही धूर किंवा त्याचा वास आला तरी त्यावर कार्यवाही करणं आवश्यक आहे.

2) आग लागल्यावर प्रथम घरातील मेन स्वीच बंद करावा.

3) आग विझवण्यासाठी पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती याच्या सहाय्यानं आग विझवण्याचा प्रयत्न करावा.

4) दुसऱ्या एकाला १०१ नंबरवर फोन करण्यास सांगणे. जेणेकरून फायर ब्रिगेड वेळेत पोहोचेल.

5) घाबरून न जाता जिथे शॉर्टसर्किट झाला असेल तो भाग मुख्य मीटरपासून लांब ठेवणं. त्याला हात न लावणं.

6) घरात आणि इमारतीच्या जिन्यात किंवा परिसरात पसरणाऱ्या धुरापासून सुरक्षित राहण्यासाठी उभं न राहता वाकून चालणं किंवा सरपटत जाणं.

7) पायात रबरी स्लीपर्स आणि हातात लाकडी काठी घेऊनच कुठल्याही बटनास हात लावणं. नाहीतर रिचर्न करंटची भीती असते.


आग प्रतिबंधक योजना

1) घर, इमारत आगीच्या धोक्यापासून सुरक्षित आहे का? याची तपासणी करून घेणं.

2) इमारतीच्या एका बाजूस अग्निशमन दलासाठी ६ मीटर मोकळी जागा ठेवणं बंधनकारक आहे.

3) सोसायटीच्या सभासदांच्या सोयीनुसार दर महिन्यातून एकदा फायर ड्रिल करावं.

4) सहा महिन्यातून एकदा मॉक फायर ड्रिलचा सराव करणं.



हेेही वाचा-

अग्निशमन दलाकडे ३० मजल्यांपर्यंतचीच शिडी!

'असं' आहे दिपिकाचं ब्यू माँड इमारतीतलं घर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा