Advertisement

'असं' आहे दिपिकाचं ब्यू माँड इमारतीतलं घर


'असं' आहे दिपिकाचं ब्यू माँड इमारतीतलं घर
SHARES

प्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील ब्यू माँड इमारतीच्या ३३ व्या मजल्यावर बुधवारी २ वाजेच्या दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. अवघ्या काही मिनीटांतच आगीने रौदरूप धारण केलं. या इमारतीत मोठ्या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची घर असून त्यात बाॅलिवूड अॅक्ट्रेस दिपिका पादुकोणचंही घर आहे. सुदैवाने या आगीत तिच्या घराला कुठलीही हानी पोहोचली नाही. 


आग लागली तेव्हा दिपिका नेमकी कुठे आहे, अशी चिंता तिच्या चाहत्यांना लागून राहिली होती. परंतु दिपिका शुटींग निमित्ताने बाहेर असल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळाने दिपिकाने स्वत: आपण सुखरूप असल्याची माहिती ट्विटरवरून चाहत्यांना दिली.


  


दिपिकाचे दोन फ्लॅट

याच इमारतीत दिपिकाच्या तब्बल एक नव्हे, तर दोन फ्लॅट आहेत. तिने घेतलेल्या या फ्लॅटची किंमत कोटींच्या घरात असून तिचा पहिला फ्लॅट २६ मजल्यावर आहे, तर दुसरा फ्लॅट ३० व्या मजल्यावर आहे.



कधी खरेदी केला होता फ्लॅट?

दिपिकाने ३० पहिला फ्लॅट २०१० साली १६ कोटी रुपयांना खरेदी केला होता. तर तिच्या दुसऱ्या फ्लॅटची किंमत २३ कोटी ७५ लाख आहे. दिपिकाचा २६ व्या मजल्यावरील हा ४ बेडरूम फ्लॅट २३१४ स्क्वेअर फूट इतकं असून या फ्लॅटचं इंटिरिअर विनीता चैतन्य यांनी केलं आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत दिपिकाचं ऑफिसही आहे.


'अशी' आहेत ब्यू माँडमधील घरं

मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या ब्यू माँड ही गगनचुंबी इमारत ३३ मजली असून त्याला बेस्ट इंटिरिअर डिझाईनचा अॅवार्ड मिळाला होता. या इमारतीत ३ विंग असून त्यात २, ३, ४ आणि ५ बीएचकेचे फ्लॅट आहेत. त्याशिवाय त्यात पार्किंग लॉट, क्लब हाऊसही आहेत. तसच यातील प्रत्येक फ्लॅटमध्ये लिव्हिंग रुम, मास्टर बेडरूम आणि टेनिस, बॅडमिंटन, स्वॅक्श कोर्ट तसंच जॉगिंग ट्रक, ओपन स्पा, मिनी थिएटर, स्विमिंग पूल आहे. त्याशिवाय लहान मुलांकरिता किड्स प्ले ग्राऊंड, स्विमिंग पूल, सॅंड प्ले एरिआ ही देण्यात आला आहे.



हेही वाचा-

Live Updates: प्रभादेवीतील ब्यूमाँड इमारतीच्या ३३ मजल्याला मोठी आग, ९५ रहिवाशांची सुखरूप सुटका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा