SHARE

मुंबईतल्या अंधेरी एमआयडीसी भागात असलेल्या कामगार रुग्णालयात सोमवारी झालेल्या अग्नितांडवानंतर बुधवारी पुन्हा एकदा कामगार रुग्णालयात आग लागली. सुदैवानं यात कोणतीही जीवतहानी झाली नाही. 


जीव वाचवण्यासाठी पळापळ 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी आठच्या सुमारास कामगार रूग्णालयाच्या बाहेर असलेल्या मीटर बॉक्सला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवानं यात कोणतीही जीवतहानी झालेली नसून आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. कामगार रूग्णालयात तीन दिवसात दुसऱ्यांदा आग लागली अाहे.  सोमवारी झालेल्या घटनेनंतर अचानक रूग्णालयाजवळ पुन्हा लागलेल्या या आगीमुळं अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू केली.
संबंधित विषय
ताज्या बातम्या