लखनऊ आणि मुंबई (mumbai) दरम्यान पहिली एसी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस राजधानी आणि शताब्दी गाड्यांपेक्षा खूप वेगवान आणि आरामदायी असल्याने रेल्वे प्रवासाला मोठी चालना मिळणार आहे.
ही नवीन स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस हरदोई, शाहजहानपूर, बरेली, मुरादाबाद, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन आणि आग्रा येथे थांबणार आहे. या रेल्वेमुळे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील प्रवाशांना याचा फायदा होईल.
महिन्यांच्या व्यापक सर्वेक्षणानंतर, रेल्वे अधिकाऱ्यांनी आगामी स्लीपर वंदे भारत (vande bharat sleeper) एक्सप्रेससाठी मार्ग निश्चित केला आहे. ही ट्रेन लखनऊहून प्रवास सुरू करेल आणि हरदोई, शाहजहानपूर, बरेली जंक्शन, रामपूर, मुरादाबाद, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन आणि आग्रा मार्गे मुंबईला पोहोचेल.
आठवड्यातून चार दिवस चालणाऱ्या या ट्रेनमध्ये 20 पूर्णपणे वातानुकूलित कोच असतील. ज्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा एसी वर्ग असेल. तसेच दोन एसएलआर कोच असतील ज्यामध्ये सुमारे 1,200 प्रवासी बसू शकतील.
याचे अधिकृत वेळापत्रक जूनमध्ये प्रसारित होणे अपेक्षित आहे, तर सेवा जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
हा नवीन मार्ग उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी, विशेषतः मुंबईला येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायद्याची ठरणार आहे. बरेली लोकमान्य टिळक एक्सप्रेस आणि रामनगर-वांद्रे एक्सप्रेस सारख्या सध्याच्या गाड्या अनेकदा भरलेल्या असल्याने स्लीपर वंदे भारत हा एक सोईस्कर पर्याय आहे.
हेही वाचा