मुंबईत पाऊस आला रे...

    मुंबई  -  

    गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना शुक्रवारी रात्री अचानक पडलेल्या पावसाने सुखद गारव्याचा अनुभव दिला. शुक्रवारी दुपारपर्यंत मुंबईत कडक ऊन जाणवत होतं. त्यात आर्द्रतेमुळे मुंबईकर हैराण झाले होते. मात्र अचानक संध्याकाळी पडलेल्या पावसामुळे हवामानात थोडा का होईन पण गारवा निर्माण झाला. चेंबूर परिसरात पावसानं मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.