Advertisement

घाऊक बाजारपेठेत मासे महागले


घाऊक बाजारपेठेत मासे महागले
SHARES

मुंबईसह राज्यभरात मागील अनेक दिवसांपासून बर्ड फ्लूचं प्रमाण वाढल्याच्या भीतीनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं नागरिकांनी चिकन, मटण व अंडी न खाता मासे खाण्याचा निर्णय घेतला. परीणामी माश्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे.

बर्ड फ्लूच्या भीतीमुळं मांसाहारींनी माशांकडे मोर्चा वळवल्यानं घाऊक बाजारपेठेत मासे प्रतिकिलो १५० ते २५० रुपयांनी महागले आहेत. शिवाय, डिसेंबर ते मार्च या थंडीच्या काळात मासे समुद्राच्या तळाशी जात असल्यानं कमी सापडतात. त्यामुळेही माशांचे दर वाढल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

यंदा थंडी अधिक असल्यानं माशांची कमतरता आहे. मूळ बाजारातच मासे महाग मिळत असल्याने भाववाढ करावी लागत असल्याचं समजतं. परंतु, भाववाढ होऊनही ग्राहकांची मागणी कमी झालेली नाही.

मासे कमी मिळाल्याने भाव वाढतो. त्यात थंडी असल्याने मासे पकडण्यासाठी अधिक कसरत करावी लागते. यामध्ये सर्वाधिक भाववाढ पापलेटच्या दरात झाली आहे. तब्बल ५०० रुपयांनी पापलेट महाग झाले असून ओले बोंबील क्वचितच मिळत आहेत.

माशांचे घाऊक बाजारातील दर

कोलंबी  ५५०

सुरमई   ६००

पापलेट  ९००

ओले बोंबील ४००

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा