Advertisement

मत्स्य उत्पादनात ३२ टक्क्यांची घसरण

अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळाचा मासेमारी व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे.

मत्स्य उत्पादनात ३२ टक्क्यांची घसरण
SHARES

अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळाचा मासेमारी व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. या वादळामुळं मच्छमारांच्या पोटावर पाय येत आहे. तसंच मोठ्या आर्थइक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अशातच राज्यातील मत्स्य उत्पादन मात्र ३२ टक्क्यांनी घसरले आहे. गतवर्षी देशभरातील सागरी मत्स्य उत्पादनात २०१९ साली २.१ टक्क्यांची वाढ झाली होती.

देशभरातील सर्व किनारी राज्यांतील मत्स्य उत्पादनाचा आढावा सीएमएफआरआयकडून दरवर्षी घेतला जातो. अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळांमुळे मासेमारीच्या दिवसांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या (सीएमएफआरआय) अहवालात मांडण्यात आले आहे.

यंदा देशात ३५ लाख ६० हजार टन मत्स्य उत्पादन झाले आहे. तर राज्यात एकूण २.०१ लाख मत्स्य उत्पादन आहे. हे प्रमाण देशातील एकूण मत्स्य उत्पादनाच्या ५.६ टक्के असून, मत्स्य उत्पादनात राज्याचा सातवा क्रमांक आहे. राज्यातील मत्स्य उत्पादनात बोंबील तिसऱ्या क्रमाकांवर असून, त्यामध्ये तुलनेने कमी घट झाली आहे. कोळंबीच्या उत्पादनातील घट मर्यादीत असली तरी पहिल्या पाच क्रमांकातील सर्वच माशांच्या उत्पादनात घट दिसून येते. एकूण उत्पादनात खोल पाण्यातील आणि महासागरी मासे अधिक आहेत.हेही वाचा -

Mumbai Containment Zones : 'ही' आहे मुंबईतील कंटेन्मेंट झोनची यादी

GSB Ganpati: जीएसबी मंडळाची राज्य सरकारकडं 'ही' विनंतीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा