Advertisement

मच्छीमारांचे आझाद मैदानात आंदोलन


मच्छीमारांचे आझाद मैदानात आंदोलन
SHARES

मुंबईचे मूळ रहिवासी असलेले कोळी बांधव आपल्या उपजीविकेचा मार्ग वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. सध्या मुंबईत सुरू असलेल्या सागरी किनारा मार्गामुळे मासेमारीवर परिणाम होत आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वीचं दादर मासळी बाजारावर निर्बध घालण्यात आले. या मासळी बाजारावर हातोडा पडल्यावर अनेक मच्छीमार बांधवांनी संताप व्यक्त केला. तसंच, बुधवार २५ ऑगस्ट रोजी हे मच्छीमार बांधव आझाद मैदान इथं आंदोलन करणार आहेत.

लॉकडाऊनच्या काळात दादर येथील ‘मीनाताई ठाकरे मासळी बाजारा’त बसण्यास मच्छीमारांना बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊन शिथिलीकरणानंतरही मच्छीमारांना इथं बसण्यास निर्बंध घातले जात आहेत. साटणी (विक्रेत्या महिला), हेलकरी (माशांची वाहतूक करणारे), व्यापारी, इत्यादी ५०० ते ६०० जण या मासळी बाजारावर अवलंबून आहे.

येथील बहुतांशी व्यापार गोड्या पाण्यातील माशांचा असतो. मात्र असे असताना अनुज्ञप्तीधारक आणि करदात्या मच्छीमारांच्या उपजीविकेवर गदा का आणली जात आहे? असा प्रश्न मच्छीमार विचारत आहेत.

सागरी किनारा मार्गासाठी समुद्रात भराव टाकण्यात येत असल्याने मासेमारीच्या जागा नष्ट होत आहेत. या मार्गासाठी बांधण्यात येणाऱ्या खांबांमधील अरुंद अंतरामुळे मासेमारी करणाऱ्या बोटींच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी मच्छीमारांशी चर्चा करण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सागरी किनारा मार्ग प्रकल्प आणि दादरच्या मासळी बाजारावरील निर्बंध याविरोधात मच्छीमार समाज एकवटला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा