Advertisement

दिलासादायक! फ्लिपकार्ट आता मराठी भाषेत उपलब्ध

फ्लिपकार्ट या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतुन खरेदी करणाऱ्या मराठी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दिलासादायक! फ्लिपकार्ट आता मराठी भाषेत उपलब्ध
SHARES

फ्लिपकार्ट या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतुन खरेदी करणाऱ्या मराठी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्ट हे आता मराठी भाषेत उपलब्ध झालं आहे. मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. यासह फ्लिपकार्ट अप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा ६ महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत.

भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे. मराठी भाषेची भर घालणे हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. लाखो फ्लिपकार्ट वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आणि बोलीभाषेतील अनुभव देण्यासाठी ५.४ दशलक्षांहून अधिक शब्दांचे भाषांतर आणि लिपित लेखन (ट्रान्सलिटरेशन) करण्यात आले आहे.

फ्लिपकार्टच्या 'लोकलायझेशन अॅण्ड ट्रान्सलेशन प्लॅटफॉर्म'वर उपलब्ध ही सोय ग्राहकांना ईकॉमर्सचा अनुभव देणार आहे. ई-कॉमर्सकडे वळणाऱ्या भारतीय ग्राहकांसमोरील समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण पर्याय देण्याच्या फ्लिपकार्टच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या व्यासपीठावर प्रादेशिक क्षमतांचा विकास करण्यात येत आहे. प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या लाखो ग्राहकांसमोरील मुख्य अडथळा यामुळे दूर होणार आहे.

भारतीय भाषांमध्ये इंटरनेटचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या २०२१ पर्यंत ७५ टक्के असेल आणि द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधील फ्लिपकार्ट वापरकर्त्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक असल्याने प्रादेशिक सेवांचा विस्तार वाढवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

आणखी २०० दशलक्ष ग्राहकांना ऑनलाइन आणण्याच्या आपल्या प्रयत्नांचा भाग म्हणून फ्लिपकार्टने व्हिडीओ, व्हॉईस आणि प्रादेशिक या तीन विभागांत अनेक उपक्रम सादर केले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा