बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हँड ग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादींच्या उड्डाणावर बंदी आहे. यासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
दहशतवादी किंवा देशविरोधी कारवायांसारख्या संभाव्य जीवितहानी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले की, हा आदेश 14 एप्रिल 2023 पर्यंत लागू राहील.
ड्रोन, पॅराग्लायडर्स इत्यादींचा वापर करून व्हीव्हीआयपींना लक्ष्य करणे, जिवीतहानी, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणे अशा संभाव्य घटनांना डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, या कालावधीत ज्यांनी पूर्व लेखी परवानगी घेतली असेल त्यांच्यासाठी हा आदेश शिथिल करण्यात येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये दंड करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा