पादचारी पुलाची दुरवस्था

 Dalmia Estate
पादचारी पुलाची दुरवस्था
पादचारी पुलाची दुरवस्था
पादचारी पुलाची दुरवस्था
पादचारी पुलाची दुरवस्था
पादचारी पुलाची दुरवस्था
See all

मुलुंड- मुलुंड मिठागर परिसर आणि पश्चिमेकडे अपना बाजार रोड यांच्या मध्ये रेल्वे रुळावरून जाणारा पादचारी पूल सध्या दुरवस्थेत आहे. सायकल नेण्यासाठी जिन्याच्या मधोमध उतरण तयार केली होती. मात्र आता ती जागोजागी ढासळलेली आहे. पुलावरच्या फरश्या तुटून अस्वच्छता पसरली आहे. तसेच पुलावर दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी जाण्या-येण्यास त्रास होत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Loading Comments