• ...आणि प्रवाशांनी घेतला मोकळा श्वास
  • ...आणि प्रवाशांनी घेतला मोकळा श्वास
SHARE

भायखळा - गेल्या अनेक दिवसांपासून भायखळा रेल्वे स्थानकाबाहेरील फुटपाथवर बकरीचे खाद्य असलेल्या पाल्याची विक्री केली जात होती. त्यामुळे प्रवाशांना अडगळीचा सामना करावा लागत होता. मात्र नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर भाजपाचे नेत रोहिदास लोखंडे यांंनी दखल घेत फुटपाथ मोकळे केले आहे.

विक्री करणारे कल्याण, बदलापूर, अंबरनाथ येथून पाला विक्री करण्यासाठी भायखळ्यात येत होते. तसेच विक्री झाल्यानंतर विक्रेते घाण टाकून तसेच निघून जात होते. रेल्वे स्थानकाबाहेरच बस स्थानक असून याचा सर्वात जास्त त्रास बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना होत होता. त्यामुळे नागरिकांनी याची तक्रार केली असता भाजपाचे नेते रोहिदास लोखंडे यांनी शुक्रवारी पाला विक्रेत्यांसोबत चर्चा करून त्यांना पाला विक्रीसाठी दुसरी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.

तसेच त्यांना फुटपाथ मोकळे करण्यासही सांगितले. पाला विक्रेत्यांनीही त्यांचे म्हणणे मान्य केले आहे. त्यामुळे इथून प्रवास करणारे प्रवासी तूर्तास तरी मोकळा श्वास घेत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या